कित्ती सहज आलीस माझ्या आयुष्यात...आणि गेलीसही नाही,
वाटे आता तू ती नव्हतीसच सये, जिच्या शोधात मी सदैव होतो ... १
बोललो बरेच प्रेमाने पण, प्रियकर म्हणुनि कधीच नाही,
नव्हतेच तुला कर्तव्य त्याशी, मी व्यर्थ वेळ दवडीत होतो ... २
राहिलो तुझा सदा सखा - खास परी कधीच नाही,
सत्य कळाले तेव्हा केवळ,नीर नेत्रीचे लपवीत होतो ... ३
गेलो मीही विसरून सारे,तुझ्या लेखी जे घडलेचि नाही,
मीही माझ्या नियतीस जेव्हा, चुकलो समजून होतो ... ४
मिटवीन वाद सारे नक्की,ठाव जयांचा तुजला नाही,
निर्माण का ते केलेस नकळत, अंदाज फक्त बांधीत होतो ... ५
गैरसमज नव्हतेच कसले, होणेही शक्य नाही,
फरक कुणाला काय पडतो, विश्वव्यापी कण्हत होतो ...६
No comments:
Post a Comment