Tuesday, 9 February 2016

कोण हनुमंतअप्पा?


बातमीसियाचीन ग्लेशियरमध्ये फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे १९ मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. तब्बल सहा दिवसांनंतर बर्फाच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्स नायक हनुमंतअप्पा कोप्पड यांची मंगळवारी तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाख प्रांतातील सियाचीन हिमनदीमध्ये बुधवारी तारखेला सकाळी झालेल्या हिमस्खलनाचा तब्बल १९,६०० फूट उंचीवरील लष्कराच्या एका चौकीला फटका बसला आणि मद्रास बटालियनचे दहा जांबाज जवान बर्फाखाली दबले गेले होते. या जवानांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि हवाई दल यांच्याकडून गेल्या सहा दिवसांपासून संयुक्तपणे शोधमोहीम सुरू होती. पैकी काहीजण दुर्दैवाने मृतावस्थेतच सापडले. बर्फात २५ ते ३० फूट खाली खोदल्यानंतर हनुमंतअप्पा हे जिवंत सापडले.

मग काय, यावर दिग्गजांच्या दिग्गज प्रतिक्रिया घ्यायला आमचे रिपोर्टरबुवा धावलेच लगेच.. बाबा केजरुद्दिन यांच्याकडे..

रिपोर्टर: सर, हनुमंतअप्पाना मोदी जाउन भेटले. तुम्हीही भेटणार असाल ना?
केजरुद्दिन: कोण.. हा कोण?
रिपोर्टर: अहो मोदी म्हणजे आपले पंत..
केजरुद्दिन: यू फूल..  तो माणूस माहितेय मला. आय बिलिव्ह इन विन्स्टन चर्चिल्स कोट - पार्डन युवर एनिमीज, बट डोन्ट फरगेट देअर नेम्स 
रिपोर्टर: अरे वा.. कित्ती छान. बर पण प्रश्न हनुमंतअप्पांबद्दल होता,
केजरुद्दिन: कधी नावपण ऐकल नाही.. कोण आहेत ते. जखमी कसे झाले.. जातीयवाद्यानी मारहाण केली का? काय झाले काय नेमके?
रिपोर्टर: अहो ते, सियाचीनमध्ये काही जवान बर्फाखाली दबले गेले होते ना, त्यापैकी हे एक आणि..
केजरुद्दिन: अच्छा ते होय.. आलं लक्षात. पण छे, मी कशाला उगाच जाऊ भेटायला. मला काही दुसरी कामे नाहीत का?
रिपोर्टर: आहेत? काय काय?
केजरुद्दिन: काही विशेष नाही, हेच ते आपलं मोदींविरुद्ध रोज एक दोन ट्विटस टाकणे आणि.. खबरदार.. ते तुम्हाला काय करायचंय.. सीएमवाली कामं असतात बरीच ऑड इव्हन, तुम्हाला नाही कळणार.
रिपोर्टर: पण तुम्हाला नाही वाटत तुम्ही त्यांना जाऊन भेटायला हवं..
केजरुद्दिन: मी कुठे जायचं, कुणाला भेटायचं हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. मी अपनी मर्जी का स्वत: मालिक आहे. मी कुणाचा गुलाम नाही.
रिपोर्टर: यूट्यूबवर उदयनराजे चानेलला सब्स्क्राइब्ड आहात वाटत.. असो पण अजून प्रश्नाचं उत्तर..
केजरुद्दिन: काय फालतुगिरी चाललीय.. सियाचीनमध्ये झाली ना ती दुर्घटना.. मी दिल्लीत आहे.. मी दिल्लीचा सीएम आहे. माझ कर्तृत्व आहेच तेवढ.. मी इकडे नवनवीन योजनाही राबवायला सुरुवात..
रिपोर्टर: अहो म्हणूनच.. तेच ना..
केजरुद्दिन: हा मीही तेच सांगतोय.. माझी पुढची नवी योजना अशी आहे की ऑड तारखेला मोदींवर टीका करायची आणि इव्हन तारखेला मात्र काहीतरी वेगळं म्हणून मोदींवर टीका करायची
रिपोर्टर: सर, त्यासाठी वेगळी मुलाखत घेऊ हवं तर कधीतरी.. मुळात जगाला जे स्पष्ट दिसतय त्यासाठी मुलाखत घ्यायची गरजच नाही..
केजरुद्दिन: अहो पण मुद्दा काय तर.. दिल्ली आणि सियाचीनमधलं अंतर. हे पहा, मला कामाच्या व्यापात आता शक्य नाही तिकडे जाऊन.. आणि मुळात आत्ता इतक्यात सियाचीनमध्ये काही इलेक्शन्सही नाहीयेत, असते तर मनिषने लिहून ठेवल असत माझ्या डायरीत 
रिपोर्टर: नाही सर, तेच सांगतोय. तिकडे जाऊन कशाला.. हनुमंतअप्पा इथे  दिल्लीतल्याच हॉस्पिटलमध्ये तर एडमिट आहेत. तुम्ही तर दिल्लीचे मुख्यमंत्री मग..
केजरुद्दिन: अरे बापरे असंय का? पण मला एक सांगा..
रिपोर्टर: बोला ना..
केजरुद्दिन: म्हणजे मी तुम्हाला असं काही विचारलं हे बाहेर कुठे कळू देऊ नका हां प्लीज.. ऑफ रेकॉर्ड ठेवा 
रिपोर्टर: अरेच्चा, असा काय प्रश्न आहे?
केजरुद्दिन: नाही म्हणजे तो.. कोण तो जो कुणी आहे तुमचा हनुमान अण्णा..
रिपोर्टर: हनुमंतअप्पा.. आणि हे आमचा तुमचा काय.. सैनिक अख्ख्या देशाचा असतो
केजरुद्दिन: ओह व्होटेव्हर.. मला सांगा, तो अल्पसंख्यांक आहे का.. मुस्लिम वगैरे.. किंवा दलित आहे का?
रिपोर्टर: ते नक्की माहीत नाही सर.. पण त्याचा इथे काय संबंध. तो शेवटी सीमेवरचा असा एक सैनिक आहे ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही घरात शांत झोपू...
केजरुद्दिन: चला निघा तुम्ही.. ते आधी माहित करून घ्या आणि मग कळवातसा तो असेल तर लगेच जाईनच की मी. इखलाकच्या घरी तर दादरीला जाऊन भेटलोच ना.. हैद्राबादच्या त्या बिचाऱ्या रोहित वेमुलाने सुसाइड केलं त्याचाही निषेध केला मी..
रिपोर्टर: सर हा कोणता नवीन नकाशा वापरता का तुम्ही.. बघायला मिळेल का?
केजरुद्दिन: म्हणजे?
रिपोर्टर: नाही म्हणजे सियाचीन दिल्लीबाहेर आहे मान्य.. पण मग दादरी, हैद्राबाद हे दिल्लीत कधीपासून आलं?
केजरुद्दिन: ते आपल ते हे.. नाही ते जरा.. काही नाहीनिघा तुम्ही. लागले लगेच माझा भूगोलाचा अभ्यास घ्यायला आणि आमच्या झोपा काढायला. शांत झोप म्हणे.. त्या मोदीने उडवून ठेवलीय ती कधीचीच. निघा..

आता सैनिकांबद्द्ल ह्यांना वाटणारी एवढी तळमळ ऐकून तरी रिपोर्टरचं पोट भरायला हवं होतं, त्याला अक्कल यायला हवी होती, पण नाही.. कोटा संपला नव्हता बहुतेक त्याचा दिवसभरातला.. म्हणजे आगीतला संपला असेल, पण फुफाट्यातला कोटा अजून बाकी होता मेरे दोस्त.. मक्काय, हे शानं गेलं पप्पूला भेटायला.. (पप्पूचं  काही  लिहिताना मक्का कसं काय लिहिलं जातं नेहमी आधी कळत नाही ब्वा)

रिपोर्टर: पप्पूसर, आपलं नुसतेच सर.. तुम्ही जाणार आहात का हनुमंतअप्पाना भेटायला ..
पप्पू: म्हणजे पुरुष ना.. नाव पुरूषाच वाटतंय
रिपोर्टर: अर्थात.. हा इसम एक रांगडा सैनिक आहे. देशासाठी डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देणारा..
पप्पू: बर मग त्याच आत्ता इथे काय?
रिपोर्टर: त्याचं काय म्हणजे.. अहो ते सियाचीनमध्ये हिमस्खलन झालं ना..
पप्पू: मग ते चीनचं चीनमध्ये बघून घेतील की.. तुमचं काय पावशेर उगाच?
रिपोर्टर: अहो चीन नाही.. सियाचीन.. ते भारतात आहे
पप्पू: अच्छा.. याह अल्ला, ओह जीझस.. म्हणजे हे हिंदुत्ववादी कट्टरपंथी जातीयवादी या थराला पोचलेत तर.. आधी नुसते सियारामचंद्र की जय म्हणत होते तोपर्यंत ठीक होतं... राम मंदिरवर अडून बसले तेही एकवेळ ठीक. पण आता ह्यांनी चक्क बर्फात जाऊन देऊळ बांधलंय? तेही फक्त सीतेच्या हनुवटीची पूजा करायला.. हे काय चाललंय काय.. मम्मीsss
रिपोर्टर: काय.. सीतेची हनुवटी?
पप्पू: रिपोर्टर ना तुम्ही.. कुणी नोकरी दिली तुम्हाला.. जर्नालिझम करताना आपण काय प्रश्न विचारतोय त्याची बेसिक माहिती तरी ठेवाल की नाही.. साधा सोपा शब्द आहे.. सियाचीन.. चीन ऑफ सिया.. म्हणजेच
रिपोर्टर: अहो नाही,, तस नाहीये ते.
पप्पू: वा .. आता तुम्ही आम्हाला शिकवणार? तसंच आहे ते.. जोपर्यंत मम्मी म्हणत नाही की हे असं नाहीये तोपर्यंत ते तसंच आहे. काय समजलात? बाय वे, सीतेचा विषय तुम्ही काढलाच आहे तर
रिपोर्टर: मी काढला?
पप्पू: हा आत्ता तुम्ही म्हणालात ना मी काढला म्हणून.. असो, तर जरा वूमेन एम्पोवरमेंटवर बोलतो मी..
रिपोर्टर: अहो पण प्रश्न वेगळा आहे.. तुम्ही कसे लगेच रोहित वेमुलाच्या कुटुंबियांना जाऊन भेटलात, तसे आता हनुमंतअप्पाना जाऊनही भेटाल ना? पुढचे २४ तास क्रिटीकल म्हणून सांगितलेत डॉक्टरांनी 
पप्पू: अरे वेमुला देशभक्त होता.. सॉरी होते
रिपोर्टर: याकुब मेमनला फाशी नको म्हणणारा देशभक्त? स्वत:च्या फेसबुक प्रोफ़ाइलवर स्वामी विवेकानंदाना यथेच्छ शिव्या घालणारा, ते मिडीओकर होते म्हणणारा, रादर त्यांना एकेरीत बोलणारा देशभक्त? मग मायनस ६० पर्यंत तापमान होत असतं त्या सियाचीनमधले सैनिक हनुमंतअप्पा कोण मग?
पप्पू: मुद्दा तो नाही..पण आधी मला सांगा की आता हे विवेक आनंद कोण नवीन? मला विजय आनंद माहिती आहेत.. डिरेक्टर होते.. देव आनंदचे भाऊ
रिपोर्टर: मला एवढच सांगा तुम्ही हनुमंत..
पप्पू: चालते व्हा.. मुद्दाम सारखे हनुमंत हनुमंत करताय तुम्ही.. हनुमंत म्हणजे रामाचा सेवक ना.. तुम्हाला हिदुत्ववाद्यांनी पाठवलंय ना... खर सांगा. पुन्हा मला जर असले फालतू प्रश्न..
रिपोर्टर: फालतू प्रश्न?
पप्पू: नाहीतर काय.. थांबा फोन आलाय मला.. ओह माय डियर सोन्यासारख्या सोनिया मम्मीचा आहे.. 'हेलो, मम्मी... काय झालं.. ओह लागलं का.. आलो आलो.' चला निघतो हो मी.. महत्त्वाचं काम आहे, जावं लागेल
रिपोर्टर: काय हो.. काय झाल?
पप्पू: अहो छोटा भीमचा रिपीट एपिसोड लागलाय.. काल मिस झाला होता माझा.. चला बाय.. काल डोरेमॉन पाहिलं पण हे राहून गेलं. असोनिघा सांगूनही इथेच आहात अजून.. निघा
रिपोर्टर: अहो पण भीम म्हणजे महाभारतातला.. आणि महाभारत म्हणजे हिंदूंचा ग्रंथ.. मग भीम कसा चालतो तुम्हाला
पप्पू: असं असतं काय? मी मम्मीला विचारून ठरवतो मग.. (शहजादे जाऊ लागतात)
पप्पू: मम्मीजी तर असे कार्यक्रमच बघायला सांगत असतील ना तुम्हाला.. त्या निमित्ताने का होईना सतत बाहेर जाऊन कुठेतरी विद्यार्थ्यांसमोर भाषणे ठोकून त्यात स्वत:चाच पोपट तरी करून घेणार नाही मग तुम्ही.. अहो तुमच्याशी बोलतोय.. अहो ऐका तरी.. श्या, गेले पण हे.. बोलायला आलो हनुमंत आणि ऐकून चाललोय भीम.. छे, का बोलत तरी का होतो मी?

No comments:

Post a Comment