चला आज शेवटी हे सिद्ध झालेच की हे नरेंद्र मोदी आणि सध्याचे सरकार पूर्णपणे प्रो - पाकिस्तानी आहे. नवाज शरीफ पाकचे वझीर ए आझम असताना त्यांच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी त्यांच्या वाढदिवशी अचानक पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना भेट देऊन येणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार
म्हणा. आणि आता तर पाकचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांचीही मर्जी संपादन करण्यासाठी हा माणूस धडपडतो आहे. पाकमध्ये दहशतवादी तळ असतील तर त्यांचा पाकलाही त्रास होतोच आहे, तिकडेही दहशतवादाची झळ पोचतेच आहे, जीवितहानी होतेच आहे, पाकिस्तानही दहशतवादाला खतपाणी न घालता उलट या खलप्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे हे आधीच्या इतर पाक पंतप्रधानांसारखेच या इम्रान खानसाहेबांचेही मत आहे. आणि माननीय नवज्योतसिंग सिद्धू यांनीही या गोष्टीची पुष्टी केल्यामुळे या मतावर शिक्कामोर्तबदेखील झाले आहे यात काहीच दुमत असण्याचे कारण नाही असे आपण नक्कीच एकमताने म्हणू शकतो.
स्वच्छ भारत अभियान करता करता सुपडा साफ पाकिस्तानातले दहशतवादी तळ ही मोहीम राबवणार का आता हे! आधी सर्जिकल स्ट्राइक आणि आता हा एअरफोर्स स्ट्राइक! छे, काय चाललंय काय नेमकं, वाढवा हे जरा.
- पराग पुजारी